Gold Price Today: भारतीय सराफा बाजारात आज (सोमवार) 1 जुलै रोजी सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहेत. सोने कधी महाग तर कधी स्वस्त होताना दिसत आहे. सोन्याच्या दराने सर्वांनाच संभ्रमात ठेवले आहे.
सोन्याचा भाव 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 87 हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 71626 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 87554 रुपये प्रति किलो आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 28 जून 2024 रोजी सोन्याचा दर 71835 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चला तर मग पाहूया सोन्या-चांदीचे नवीनतम दर:-
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, आज म्हणजेच १ जुलै रोजी सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी सकाळी ९९५ शुद्ध सोन्याचा दर ७१३३९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
याशिवाय 916 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 65609 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 53720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 41901 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा भाव किती?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,240 रुपये प्रति तोळा, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला.
दिल्लीत सोन्याचा दर किती आहे?
23 जून 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,390 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 72,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव किती आहे?
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 66,290 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.